घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कल्याण येथे भाद्रपद दिंडी सोहळ्यात ह.भ.प. बबनबुवा चोरघे महाराज यांना ‘सिंहगड वारकरी भूषण’ पुरस्कार


कल्याण : भाद्रपद मास दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने कल्याण गावात धार्मिक व भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हभप धर्माजी महाराज गो-हेकर यांच्या भाद्रपद मास दिंडीच्या २५५ व्या वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात ह.भ.प. संभाजी महाराज दारवटकर यांचे कीर्तन झाले.
यावेळी मागील ४५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची तसेच कीर्तनसेवेची अखंड सेवा करणारे हभप बबनबुवा चोरघे महाराज यांना वै. खंडूजी डिंबळे पाटील यांच्या स्मरणार्थ ‘सिंहगड वारकरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे वारकरी संप्रदायातील त्यांच्या दीर्घकालीन सेवेला गौरव प्राप्त झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यास सिंहगड परिसरातील अनेक वारकरी, नामवंत मंडळी, भक्त परिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी सोहळ्याचे यंदाचे २५५ वे वर्ष असल्याने कल्याण ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन भव्य व दिमाखदार स्वरूपात करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें