घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – शांताराम लांघे

सिंहगड: गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य, सिंहगड विभाग यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यंदाही रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी किल्ले सिंहगडाचे गडदैवत असलेल्या आदिशक्ती श्री चौंडाई माता यांच्या ऐतिहासिक मूळ मंदिर (भातखळे) परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

सकाळी ८ वाजता ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘चौंडाई माते की जय’ अशा जयघोषात मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात वाढलेली झुडपे व गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच मंदिराभोवती दगड लावून विस्कटलेला चौकोनी बांध व्यवस्थित करण्यात आला.


त्यानंतर मंदिराची स्वच्छता करून मंदिर परिसरात भगवे पताके लावण्यात आले. त्यामुळे मंदिराच्या परिसराला अधिक आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छता मोहिमेच्या समारोपप्रसंगी आदिशक्ती श्री चौंडाई मातेची पूजा व आरती करण्यात आली.

या मोहिमेचे आयोजन सिंहगड विभाग प्रमुख शांताराम लांघे, मोसिन मुल्ला, जीवन बराटे, श्रीनाथ घाडी, सौरभ शिंदे मतई, महिला प्रमुख मंजिरी मुल्ला, अनन्या शिंदे आणि श्रावणी घाडी यांनी केले.

या मोहिमेला मा. पंचायत समिती सदस्य दत्ता जोरकर, मा.सरपंच पांडुरंग सुपेकर,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पढेर, निलेश सांगळे, रंगनाथ पढेर, धनराज सांबरे , वनविभाग सिंहगड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ऐतिहासिक वारसा जतन करणे, गड-किल्ल्यांवरील धार्मिक व ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या गड दैवत परीसर ,गडसंवर्धन स्वच्छतेचा संदेश व ऐतिहासिक वारसा जपणे हिच काळाची गरज आहे यांच उद्देशाने मोहीम राबविण्यात येत असतें

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें