घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचे आश्वासन

पुणे प्रतिनिधी ज्योतिबा सावंत

शेतकऱ्यांचे २०२६ सालातील चालू पीक कर्ज २ लाख रुपयांपर्यंत माफ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यात आले.

अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बायोमेट्रिक पडताळणीसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेतली. शेतकऱ्यांचे २०२६ सालातील पीक कर्ज २ लाख रुपयांपर्यंत माफ करण्याबाबत समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीकडून देण्यात आली.

मंत्र्यांच्या आश्वासनानंतर राष्ट्रीय मराठा पार्टीने आपले उपोषण आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे पत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याला दिले आहे.

दरम्यान, आश्वासनाबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.

आता समितीची स्थापना आणि पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें