पुणे प्रतिनिधी शांताराम लांघे
१७ पश्चिम हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून भात, भुईमूग, घेवडा यांसह अनेक पिके पाण्याअभावी जळून (करपू) चालली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असताना, हवेली तालुक्यातील प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज आमदार श्री. मा.भीमराव (अण्णा) तापकीर यांनी दौऱा केला.या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासमवेत श्री. शरद (लालाशेठ) जावळकर (मा. सरपंच, खानापूर), श्री. नवनाथ तागुंदे (अध्यक्ष, खडकवासला भाजपा), सौ. संतोषी ताई दारवटकर (सरपंच, खामगाव) आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शेतबांधावर जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या.*पंचनामे करून मोबदला द्या – आमदार श्री .मा.भिमराव तापकीर*पाहणीनंतर बोलताना आमदार श्री मा.भीमराव अण्णा तापकीर म्हणाले की, “पश्चिम हवेलीतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभी केलेली पिके डोळ्यादेखत जळत आहेत. प्रशासनाने तातडीने या भागाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला व नुकसान भरपाई द्यावी, अशी आम्ही शासनाकडे जोरदार मागणी करणार आहोत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.”या दौऱ्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला असून, प्रशासन आता किती लवकर पंचनाम्याची कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










