घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘कायदा जाणून घ्या… स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करा!’

विद्या निकेतन हायस्कूलमध्ये बालसंरक्षण व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात

पांचगणी : प्रमोद रांजणे – विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची आणि सुरक्षिततेची जाणीव व्हावी, तसेच बालकांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती मिळावी या उद्देशाने विद्या निकेतन हायस्कूल, पांचगणी येथे महिला व बाल विकास विभाग, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस महिला व बाल विकास विभाग, सातारा अंतर्गत संरक्षण अधिकारी माननीय श्री. चंद्रकांत पाटील सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालसंरक्षण कायदा (POCSO Act), बाल न्याय अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि POSH कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.
‘गुड टच–बॅड टच’, बालकांवरील शोषणापासून संरक्षण, अडचणीच्या प्रसंगी कोणाशी संपर्क साधावा, तक्रार कशी करावी, स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्राचार्य व ॲडमिनिस्ट्रेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यावेळी शाळेचे प्राचार्य अथर्व बिरामणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर आपल्या हक्कांबाबतही जागरूक असले पाहिजे. कोणतीही चुकीची घटना घडल्यास घाबरून किंवा गप्प बसून न राहता तातडीने पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद साधावा,” अशा सूचना दिल्या.
तसेच ॲडमिनिस्ट्रेटर स्वाती बिरामणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत विशेष सूचना देताना, “शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सन्मानजनक आणि आनंदी वातावरण मिळणे ही शाळेची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी एकमेकांचा आदर करावा, कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करू नये आणि काही अडचण असल्यास ती त्वरित शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी,” असे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे, अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर न करणे, संशयास्पद परिस्थितीत सावध राहणे आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचे धैर्य ठेवणे याबाबतही सूचना दिल्या.
‘जागरूक विद्यार्थीच घडवतील सुरक्षित समाज!’
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ कायद्यांची माहिती मिळाली नाही, तर स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी, इतरांचा आदर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य याचीही जाणीव झाली.
विद्या निकेतन हायस्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या सुरक्षितता, मानसिक सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीवा यांना प्राधान्य दिले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“कायद्याची माहिती म्हणजे भीती नव्हे; ती आपल्या सुरक्षिततेची ताकद आहे!” या संदेशाने कार्यशाळेचा समारोप झाला. महिला व बाल विकास विभागाचे तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री. चंद्रकांत पाटील सर यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें