घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी अमोल सणस यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे मित्रपरिवारासह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमोल सणस यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला जनसंपर्क, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि संघटनात्मक कामातील सक्रियता यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. माणसे जोडण्याची हातोटी, कामाप्रती असलेली तळमळ आणि जबाबदारी स्वीकारून पुढे जाण्याची वृत्ती ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा पक्षाच्या उद्योग आघाडीला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मित्रपरिवाराने व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल सोमनाथ वाडकर, शेखर फरांदे, प्रशांत थोरवे,श्रावण नलावडे, सचिन जगताप, राहुल नलावडे, जितेंद्र निंबाळकर,राऊत इप्पीरगे आणि किरण यादव यांनी सातारा येथे अमोल सणस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मित्रमंडळींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमोल सणस यांनी मित्रपरिवाराचे आभार मानताना सांगितले की, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. भविष्यातही तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन.” अमोल सणस यांच्या नव्या जबाबदारीमुळे मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या हातून उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आणि पक्ष संघटन बळकट करण्यासाठी उल्लेखनीय कार्य घडावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें