घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*”अजित पवारांच्या तेराव्याचा धार्मिक विधी झाल्यानंतर सगळं सांगणार,”- रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाच्या गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी वेग धरला आहे.

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजित पवारांची इच्छा असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्यांनी मला निश्चित सांगितले असते, असे म्हणत चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सूचित केले.यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा तेराव्याचा विधी झाला की सगळं सांगतो, असा इशारा दिला.

काय म्हणाले रोहित पवार ?

“विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही दावे प्रतिदावे सुरू आहेत. मी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात भाष्य करणार आहे. आता राजकीय बोलणे योग्य होणार नाही. पवार घराण्यात सध्या दु:खाचे वातावरण आहे.एकदा अजित पवार यांच्या तेराव्याचा धार्मिक विधी होऊ द्या. विलिनीकरणाच्या बाबतीत दादांसोबत काय चर्चा झाली, या सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल,” असे रोहित पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई झाली का, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, “त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचे पक्षाचे प्रमुख लोक प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्या अनुषंगाने चर्चा करीत होते.मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. त्यानंतर त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली आणि शपथविधीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें