घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत वाईची सना शेख सई धायगुडे हिने पटकावला टायटल बेल्ट 🥇🥊

प्रतिनिधी : संदेश चव्हाण
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याची कन्या सना शेख सई धायगुडे हिने राष्ट्रीय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत टायटल बेल्टवर आपले नाव कोरले आहे. महाबळेश्वर तालुक्यात पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून आलेल्या नामांकित आणि अनुभवी खेळाडूंशी लढत देत सना हिने आपल्या वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सना हिने तांत्रिक कौशल्य, ताकद आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक वर्चस्व मिळवत विजय खेचून आणला. तिच्या या आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळामुळे प्रेक्षकांसह पंचांनीही विशेष दखल घेतली.
या घवघवीत यशामुळे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून, सना हिच्यावर महाराष्ट्रभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष पाशा आतार सर, तसेच जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी व विविध संघटनांनी सना हिचे मनापासून अभिनंदन केले आहे.
सना शेख सई धायगुडे हिला स्पोर्ट्स मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष रविराज गाढवे सर, सचिव वजीर शेख सर, क्रीडा शिक्षक सचिन लंबे सर आणि सोफिया मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय साळुंखे, ओमकार जाधव, तसेच अनेक खेळाडू व पालकांचे सहकार्य लाभले. सना हिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें