घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कात्रज चौकात रिक्षाचालकांवर ट्रॅफिक पोलिसांची धडक कारवाई; अवैध वडाप वाहतूक आणि नो-पार्किंगमधील रिक्षांवर कडक अंमलबजावणी

कात्रज | प्रतिनिधी

आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी कात्रज चौकातून दत्तनगरच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गावर रिक्षाचालकांच्या बेशिस्त व अवैध कारभारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर भारती विद्यापीठ ट्रॅफिक विभागाकडून मोठी आणि कडक कारवाई करण्यात आली.कात्रज चौक परिसरात रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून अवैध पद्धतीने वडाप वाहतूक, तसेच नो पार्किंग झोनमध्ये आडव्या पद्धतीने शेकडो रिक्षांचे पार्किंग केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी होत असून, अपघाताचा धोका देखील वाढत होता.या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ ट्रॅफिक विभागाने नियंत्रण मोहीम राबवत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट कारवाई केली.

अवैध वडाप वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा हटवण्यात आल्या.या कारवाईमुळे काही काळातच कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत झाली असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी यापुढेही अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू राहील, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

नागरिकांनी देखील वाहतूक नियमांचे पालन करावे, सहकार्य करावे, असे आवाहन ट्रॅफिक विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें