घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*वाघोलीतील भावडी परिसरात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, एक महिला अटकेत

वाघोली परिसरातील भावडी (ता. हवेली) येथे सुरू असलेली अवैध गावठी हातभट्टी गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त करत सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट सातच्या पथकातील पोलिस अंमलदार निर्णय लांडे आणि बाळासाहेब तनपुरे यांना भावडी गावातील तांबे वस्ती, खाणीजवळ गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.छाप्यादरम्यान जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात साठवून ठेवलेले सुमारे ८ हजार लिटर कच्चे रसायन, अंदाजे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे, तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे १५ हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी प्रल्हाद कदम राठोड (वय २५, रा. भावडी, ता. हवेली; मूळ रा. टेकवडी, ता. पुरंदर) आणि अंकिता गणेश गुडदावत (वय २३, रा. भावडी, ता. हवेली) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैधरित्या दारू तयार करून विक्री करण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वाघोली पोलिस ठाण्याचे अधिकारी करत असून, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.अवैध हातभट्टीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला तसेच कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने, अशा कारवायांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें