घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*खंबाटकी घाटात वन विभागाकडून जाळपट्टा

सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट परिसरात तालुका वन विभागाच्या वतीने जाळपट्टा काढण्यात आला आहे.यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या जंगलाला लागणाऱ्या आगीपासून संरक्षण आणि होणाऱ्या नुकसानीस आळा बसणार आहे.

तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी मारुती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा वनपाल अमित वाजे, वनरक्षक सूर्याजी ठोंबरे व वनमजूर दीपक आवटे यांनी परिश्रम घेत या खंबाटकी घाटाभोवती तसेच परिसरातील डोंगररांगेच्या पायथ्याशी १० ते १५ फूट रुंदीचा जाळपट्टा काढण्यात आला, तसेच डोंगररांगेतील शेजारील गावागावांत एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या वनवणवा सप्ताहामध्ये या घाटाशेजारील गावात जनजागृती करण्यात आली.

यावेळी आपल्या रानात गवत काडी पेटविल्यास वणवा लागू नये, याची काळजी कशी घ्यावी? व वणव्यामुळे होणारे नुकसान याबाबत या गावात वन विभागाकडून जनजागृती करण्यात आली.खंडाळा घाट परिसरासह इतर भागातही वणवा लागून दरवर्षी हजारो झाडांचे नुकसान होते, तसेच जंगलाशेजारील रानातही वणवा गेल्यानंतर फळपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

वन्यप्राण्यांची पळापळ होत असल्याचेही चित्र आहे.जाळपट्टा काढल्याने तसेच वनवणवा सप्ताह जनजागृतीमुळे हे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने काळजी घेतली असल्याचे तालुका वन अधिकारी मारुती निकम यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें