घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*एका दिवसात 80 हजारांहून अधिक उपद्रव शुल्क जमा

सिंहगड किल्ल्यावर वाहनाने येणाऱ्या पर्यटकांकडून रविवारी (दि.8) दिवसभरात वनविभागाच्या वतीने 80 हजार 150 रुपयांचा उपद्रव शुल्क जमा करण्यात आला. सुट्टीच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सिंहगड, राजगडसह खडकवासला, पानशेत आदी पर्यटन स्थळांकडे धाव घेतली.

किल्ले सिंहगडावर वनविभागाच्या वतीने गोळेवाडी नाका, कोंढणपूर फाटा येथे वनविभागाचे सुरक्षा रक्षकांनी थांबून योग्य वाहतूक नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दीतून सुटका झाली. सिंहगडाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर, नितीन गोळे आदींसह सुरक्षारक्षक तैनात होते.

रविवारी दिवसभरात गडावर पर्यटकांची दुचाकी 835 व चारचाकी 382 वाहने गेली. दुपारी पर्यटकांची संख्या वाढली. त्यामुळे घाट रस्त्यावर काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. गडावरून खाली येणाऱ्या वाहनांच्या प्रमाणात वाहने गडावर सोडण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें