घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कासारवाडी पुलावर भीषण अपघात

बेदरकारपणे ट्रक चालवून एका मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास कासारवाडी येथील ओव्हर ब्रिजवरील बीआरटी स्टॉपजवळ घडली.

पूजा रोशन ठोंबरे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत वैभव सुभाष ठोंबरे (वय ३२, रा. बग्गा कॉलनी, ओझर, जि. नाशिक) यांनी रविवारी (दि. ७) दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी एका अनोळखी आयशर ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईक प्रशांत शिंदे हे त्यांच्या मोटारसायकलवरून मेव्हणी आणि पुतणीसह जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादीची वहिनी पूजा रोशन ठोंबरे यांचा मृत्यू झाला, तर प्रशांत शिंदे आणि लहान मुलगी किमया हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. दापोडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें