घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*महिला शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार जणांना नवजीवन

पुरंदर तालुक्यातील ६० वर्षीय महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला दिलेल्या संमतीमुळे चार जणांना नवजीवन मिळाले आहे. रस्त्‍याच्‍या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना हडपसरमधील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते.

पतीसमवेत दुचाकीवरून ६ फेब्रुवारी रोजी त्या प्रवास करत असताना त्‍यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांच्‍याही मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने हडपसर येथील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

८ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी मोठे धैर्य दाखवत अवयवदानास संमती दिली. ९ फेब्रुवारी रोजी त्‍यांचे फुफ्फुस, यकृत आणि दोन मूत्रपिंडाचे अवयवदान करण्यात आले. फुफ्फुस पुण्यातील दुसऱ्या रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले.

एक मूत्रपिंड नाशिक तर दुसरे मूत्रपिंड आणि यकृत नोबल हॉस्पिटलमध्येच दोन वेगवेगळ्या रुग्‍णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. यकृताचे प्रत्यारोपण दीर्घकालीन यकृत आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षीय रुग्णावर व मूत्रपिंड हे ३५ वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. त्‍या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ‘झेडटीसीसी’ च्‍या समन्‍वयिका आरती गोखले यांनी दिली.

नोबल रुग्‍णालयाचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे म्‍हणाले की, कुटुंबीयांच्या संमतीमुळे अवयवदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. या प्रक्रियेत समन्वय साधल्याबद्दल त्‍यांनी विभागीय अवयव प्रत्‍यारोपण समन्‍वय समिती (झेडटीसीसी) चे आभार मानले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण पथकामध्ये यकृत उपचार विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत भांगे, भूलतज्ज्ञ डॉ. गीतांजली आखाडे, डॉ. बिपिन विभूते, डॉ. स्मिता पारख, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक तसेच प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे व अश्विनी कवडे यांचा समावेश होता. दरम्यान, अपघातात जखमी झालेले अवयवदात्‍या महिलेचे पती यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें