घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*विंग अक्षय डाळीची केंद्रीय रिझर्व पोलीस दलात निवड

येथील सामान्य कुटुंबातील अक्षय संपतराव डाळे याची केंद्रीय राखीव पोलिस दलात निवड झाली. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्याने यश संपादन केले.

त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.अक्षयचे प्राथमिक शिक्षण विंग येथील केंद्र शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालयात पूर्ण करून त्याने कऱ्हाड येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच त्याने सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न मनात बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने गारगोटी येथे विशेष प्रशिक्षण घेत कठोर परिश्रम केले.

निवड झाल्याची बातमी समजताच कुटुंबीयांचा आणि ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना. अक्षयच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावातून सवाद्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्याचा सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. गावातील युवकांसाठी अक्षय प्रेरणास्थान ठरला आहे.

अमेटी (उत्तरप्रदेश) येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अक्षय सध्या छत्तीसगड येथे रुजू झाला आहे. देशसेवेची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त करत त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे.

ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आनंदा डाळे यांनी अक्षयला सुरुवातीपासून प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याबद्दलही कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अक्षयच्या या यशामुळे विंग गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें