घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावल्याचे समोर आले आहे.

या आगीत मुलाचे वडील ५० टक्के भाजले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

मृतक रवींद्र भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करतो. बाप-लेक दोघांनाही दारूचे व्यसन होते. शनिवारी (दि. ७) या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात वडील रवींद्र हे गंभीररीत्या भाजले गेले.आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणली. त्यांनतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

त्यांच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी मध्यरात्री भालेराव मरण पावले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें