घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कात्रजमध्ये बंगल्याच्या आवारातून चंदनाची चोरी, पोलिसांची तपासणी सुरू

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शेलारमळा परिसरात वास्तव्यास आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला.

त्यानंतर चंदनाचे झाड कापून चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मागील काही दिवसांपासून शहरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे बंगल्यांच्या आवारातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें