घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*उपमहापौर परशुराम वाडेकर यांची बोपोडी व औंध रोड भागातील रुग्णालयांना भेट

महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बोपोडी व औंध रोड परिसरातील महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या दौर्‍यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय येथे पाहणी करताना रुग्णालय तातडीने युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले.

अद्ययावत यंत्रसामग्री, आवश्यक सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.यानंतर कै. द्रोपतीबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालय येथेही पाहणी करण्यात आली. येथे आवश्यक सुधारणा व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.

औंध रोडवरील बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना येथे केवळ ओपीडीपुरती मर्यादा न ठेवता, खेडेकर रुग्णालयाच्या धर्तीवर प्रस्तुतीगृह, फिजिओथेरपी सेंटर, रुग्णवाहिका तसेच एक्स-रे सुविधा सुरू करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.

या पाहणीवेळी आरोग्य अधिकारी डॉ. मीना बोराडे, परिमंडल क्रमांक २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश बगाडे तसेच शेवाळे दवाखान्याच्या डॉ. मैथिली कुलकर्णी उपस्थित होत्या. याशिवाय संबंधित कर्मचारी व स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमहापौर वाडेकर यांनी “नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे,” असे नमूद करत सुधारणा कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें