घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*१७ महिन्यांचा वनवास संपला, ‘तो’ अखेर जेरबंद!’

पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने १७ महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीस अटक करून मोठी कारवाई केली आहे.दि. १३/०२/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मधील पोलीस अंमलदार साईकुमार कारके (बॅ.नं. ८७३२) यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.

उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ११८/२०२४ अंतर्गत शस्त्र अधिनियम कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), ३७ (३), १३५ व भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी महादेव श्रीरंग झाडे (वय २१, रा. अतुलनगर, चौधरी शाळेच्या पाठीमागे, एन.डी.ए. रोड, वारजे माळवाडी, पुणे) हा मिळून येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले. अधिक चौकशीदरम्यान आरोपीने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पुढील तपासकामी आरोपीस उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस मधील पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, साईकुमार कारके, महेश पाटील यांनी यशस्वीरीत्या केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें