घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पोलिसांच्या भितीने पळाला, इमारतीवरुन पडून जीव गेला

पोलिसांच्या कारवाईदरम्यान पाठलाग सुरु असताना इमारतीवरुन पडून आरोपीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा तरुण कोणत्या गुन्ह्यातील आरोपी होता? नेमकं काय प्रकरण होतं? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही..

नेमकं काय घडलं?

पुण्यात सुरू असलेला एक थरारक पाठलाग अत्यंत दुर्दैवी वळणावर संपला. पोलिसांच्या कारवाईदरम्यान संशयित उंच इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी धोकादायक पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तो कोणत्याही सुरक्षेशिवाय इमारतीवर चढतो. त्याला पकडण्यासाठी पोलिस अधिकारी बाल्कनी आणि खिडक्या वापरून वर चढण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांना पाहून आरोपी प्रचंड घाबरतो. तो पुढचा मागचा कसलाही विचार न करता आधी इमारतीवर चढतो अन् पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा तोल जातो अन् तो थेट खाली कोसळतो. या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी अंत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरोपीला पकडण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य होती का असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीवर कोणतेही आरोप असले तरी, त्यांना जिवंत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें