घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात धारदार हत्यारांनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

धारदार हत्यारांनी दोघांवर जीवघेणा हल्ला करून वडगाव बुद्रूक परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीतील चौघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

वडगाव बुद्रूक परिसरात चार फेब्रुवारी रोजी एका टोळक्याने मोटारीची काच फोडून दोघांवर हत्यारांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी तपासाबाबत सूचना दिल्या.त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांच्या तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

त्यावरून आरोपींची ओळख पटवून अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. दांडेकर पूल), निशांत राजेश राऊत (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर), सुमीत अनिल माने (वय २२, रा. हडपसर) आणि स्वप्नील चंद्रकांत गायकवाड (वय २०, रा. बिबवेवाडी) या चौघांना अटक करण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें