अवघ्या पाच दिवसांत पाच हजार ट्रीपल सीट चालकांवर कारवाया;एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणाऱ्यांवर (ट्रिपल सीट) वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी व्यापक कारवाई करत तब्बल ५ हजार ३८० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
या विशेष मोहिमेत एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.शहरातील प्रमुख चौक, सिग्नल परिसर, वाहतूक कोंडीची ठिकाणे तसेच अपघातप्रवण रस्त्यांवर विशेष तपासणी पथके तैनात करून ही कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडच नव्हे, तर गंभीर अपघातांचा धोका वाढतो, याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे.ट्रीपल सीट व्यतिरिक्त हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा भंग करणे, कागदपत्रांशिवाय वाहन चालवणे आदी विविध नियमभंगांवरही कारवाई करण्यात येत आहे.
प्रमुख रस्त्यांवर कायमस्वरूपी पथके तैनात करण्यात आली असून पुढील काळातही अशी मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त Himmat Jadhav यांनी सांगितले की, “नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ट्रीपल सीट प्रवासामुळे वाहनावरील नियंत्रण कमी होते आणि अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.”या कारवाईमुळे बेफिकीर वाहनचालकांमध्ये काही प्रमाणात तरी शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, वाहतूक कोंडीची ठिकाणे, सिग्नल परिसर तसेच अपघातप्रवण रस्त्यांवर ही विशेष तपासणी मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर अपघाताच्या स्वरूपात जीवितहानीचा धोका वाढतो, असे नमूद करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
ट्रीपल सीटसह इतर विविध प्रकारचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी प्रमुख रस्त्यांवर पथक तैनात करण्यात आली आहेत. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.












