घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*’प्रताप हिची मस्ती जिरव’, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

व्याजाने घेतलेले पैसे परत केले असतानाही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेवर अत्याचार केला. पत्नीच्या मदतीने तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भारती विद्यापीठ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

प्रताप रमेश जाधव (४५) आणि त्याची पत्नी पल्लवी दादासो कारंडे/ पल्लवी प्रताप जाधव (२८, दोघे रा. भिंताडेनगर, सिंहगड कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी या पती पत्नी व एका वकिलासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पल्लवी जाधव या मैत्रिणी आहेत. फिर्यादी यांनी प्रताप जाधव याच्याकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी ते पैसे परत केले होते. असे असताना त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने प्रताप जाधव याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केले. त्याची तक्रार देण्यासाठी त्या पोलिसांकडे जात असताना प्रताप व पल्लवी यांनी पुन्हा फिर्यादीकडे पैशांची मागणी केली.

त्यावर फिर्यादी यांनी त्यांना पूर्ण पैसे दिले आहेत, आता आणखी देऊ शकत नाही, असे म्हणाली. तेव्हा पल्लवी हिने प्रताप याला ‘प्रताप हिची मस्ती जिरव’ असे म्हणाली. तेव्हा पल्लवी घरात असताना प्रताप याने फिर्यादी हिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ व फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

प्रताप, पल्लवी व इतरांनी उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास फिर्यादीला २० ते २५ लाख रुपये व एक फ्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी तसे करण्यास नकार दिल्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें