घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*मोबाइल हिसकावून पसार झालेला अल्पवयीन ताब्यात

येरवडा भागात पादचाऱ्याकडील एक लाख रुपयांचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. अल्पवयीनाने येरवडा, तसेच महापालिका भवन परिसरात मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

त्याच्याकडून एक लाख रुपयांचा मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे.येरवडा भागात तीन दिवसांपूर्वी रात्री एका पादचारी तरुणाकडील एक लाख रुपयांचा मोबाइल हिसकावून अल्पवयीन आणि त्याचा साथीदार दुचाकीवरुन पसार झाले होते.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट चार, तसेच दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून तपास करण्यात येत होता. खडकीतील मुळा रस्ता परिसरात एक जण मोबाइल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने येरवडा भागात एकाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याच दिवशी रात्री त्याने महापालिका भवन परिसरात एकाकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.महापालिका भवन परिसरात हिसकावलेला मोबाइल संच त्याच्या साथीदाराकडे असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

अल्पवयीनाने साथीदाराच्या मदतीने मोबइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपयाुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक वैभव मगदूम, एकनाथ जोशी, प्रवीण राजपूत, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, अमजद शेख, किशोर दुशिंग यांनी ही कामगिरी केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें