घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पाडळी निकम वस्ती जि.प. शाळेला ३२ फुलझाडांच्या कुंड्यांची भेट; विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस उत्साहात साजरा .

पाडळी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद पाडळी निकम वस्ती शाळेला व्हॉइस ऑफ मीडिया व सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ फुलझाडांच्या कुंड्या भेट देण्यात आल्या. तसेच शाळेतील १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
शाळेच्या परिसरात हिरवळ वाढवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष दशरथ राऊत, उपाध्यक्ष संदेश चव्हाण, संपर्कप्रमुख सुनील रासकर, सदस्य विजय शेळके, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत धायगुडे, पाडळी जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबा धायगुडे, सुजन फौंडेशनचे अध्यक्ष अजित कुमार जाधव, संपादक मोहन बोरकर, पालक सोमनाथ धायगुडे तसेच निकम वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले.

शाळेच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक नजमा डांगे मॅडम व शिक्षिका स्वाती आरेकर मॅडम यांनी आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही असे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें