घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस.पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे | प्रतिनिधी
अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस.पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसर शिवमय झाला होता.
या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ सोकांडे सर व संस्थापिका सचिव मा. मंगलताई सोकांडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. ज्ञानेश्वर मुळे (समन्वयक, श्री संत तुकाराम महाराज शिक्षण संस्था, रहाटणी, पुणे, सातारा) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. वातावरणात शिवगर्जना घुमत असताना उपस्थितांनी शिवरायांना अभिवादन केले.


यावेळी प्रमुख पाहुणे मा. ज्ञानेश्वर मुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी विचार मांडले. स्वराज्याची संकल्पना, शौर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले. शाळेच्या संस्थापिका सचिव मा. सौ. मंगलताई सोकांडे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे जीवन आदर्श मानून आत्मविश्वास, कठोर परिश्रम, ध्येयवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. जबाबदार नागरिक घडवणे आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करणे हेच शिवरायांना खरे अभिवादन ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोवाडा, शिवगर्जना, प्रभावी भाषण तसेच देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. अमर सोकांडे सर व मुख्याध्यापिका सौ. पल्लवी सोकांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या शौर्य, स्वराज्याची भावना, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगुणांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें