पुणे | प्रतिनिधी
ऑरा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल परिवाराकडून यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून वंदनाने झाली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले आणि संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.या प्रसंगी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बालाजी कल्याणे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच माननीय श्री. किशनराव कल्याणे सर, माननीय श्री. गोगावले सर, डॉ. अभिजीत गायकवाड सर, माननीय श्री. योगेश कल्याणे सर, डॉ. अनुराधा कल्याणे मॅडम, माननीय सौ. सुशीला कल्याणे यांच्यासह ऑरा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, सिस्टर, ब्रदर आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श आपल्या कार्यात अंगीकारण्याचा संदेश दिला.
रुग्णसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांचे स्मरण करत समाजसेवेची नवी ऊर्जा घेण्याचा संकल्प केला.











