घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राज्यात उन्हाचा चटका वाढणार

राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच, तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत आहे. गारठा कमी होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. आज (ता. २०) राज्याच्या किमान आणि कमाल तापमान आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १९) पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या पुनलूर येथे देशातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, श्रीलंकेकडे येताना ही प्रणाली निवळून जाण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

गुरुवारी (ता. १९) धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ झाली असतानाच, राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २०) राज्याच्या कमाल आणि किमान तापमान आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

‎सरासरी तापमान (अंश से.)‎विभाग किमान कमाल‎

उत्तर महाराष्ट्र १४.५ ३४.०

‎पश्‍चिम महाराष्ट्र १४.५ ३३.४‎

मराठवाडा १६.२ ३३.५‎

विदर्भ १५.० ३५.६‎

कोकण १८.५ ३२.२

गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :शहर कमाल किमानपुणे ३२.७ १८.४

अहिल्यानगर ३१.९ १६.३

धुळे ३३.० १४.५

जळगाव निरंक १७.२

जेऊर ३३.० १४.५‎‎

कोल्हापूर ३२.२ १९.७

‎महाबळेश्वर २५.१ १६.०

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें