पुणे येथील ज्येष्ठ नागरिक संघ,जांभुळवाडी रोड तर्फे श्रीमंतयोगी राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी संघाचे सभासद श्री शिवदास खटे हे होते.प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष संजय रणसिंग, सचिव म्हाळसाकांत जोशी यांनी केले तसेच याप्रसंगी संघाचे सभासद गायक श्री सुर्यकुमार भोकरे यांनी छ.शिवाजी महाराज जन्माचा पाळणा व पोवाडा आणि गीते गायली.
तर उपस्थीत सर्व सभासदांनी छ.शिवाजी महाराजकी जय,जय शिवाजी जय भवानीचा जयघोष केला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय रणसिंग, सचिव म्हाळसाकांत जोशी, खजिनदार नितीन कुलकर्णी, सह खजीनदार अनिल ढोकळे सभासद नामदेव पवार, भास्कर चव्हाण, ज्ञानेश्वर वाघमारे, शिवदास खटे, सूर्यकुमार भोकरे , दिलीप तोडकर, विठ्ठल पुजारी, राजेंद्र क्षीरसागर सभासद उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्रा विषयी सर्वांनी समयोचित भाषणे केली.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.












