घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील शिवाजीनगरमध्ये अण्णा हॉटेलला आग

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील शिरोळे रस्त्यावर असलेल्या अण्णा हॉटेल येथे शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं.

घटनेची माहिती मिळताच पुणेअग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हॉटेलच्या किचन भागातून धूर येताना दिसल्याने लगेच पोलिस व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यामुळे शिरोळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवल्यानंतर पंचनामा करून पुढील तपास केला जाणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें