जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते.अनेकदा काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. चाकण आणिआता तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे.
आता तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे.
चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. यामुळे या परिसरातून रोज हजारो वाहने जातात. या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सतात्याने वाढत आहे. यामुळेच ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमआयडीसीने पर्याय रस्त्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.
नवीन रस्ता मुंबई पुणे जुन्या महामार्गावरुन सुरु होणार आहोत. तो पुढे देहूरोडकडून तळेगाव एमआयडीसीत प्रवेश करता येईल.तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील नवलाख उंबरे गावाबाहेरुन नवीन रस्ता करण्यात आला आहे. या ठिकाणी गावातून एक रस्ता आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.आता नवीन रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणारआहे.
ह्युंदाई चौक ते तळेगाव आणि चाकणमध्ये हा रस्ता पुढे जाईल. यानंतर हा रस्ता कॉर्निंग कंपनीपासून भाम नदीपर्यंत रस्ता असेल. तिथून पुढे पुणे नाशिक महामार्गाशी जोडला गेला आहे.त्यामुळे चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याला हा पर्यायी रस्ता असणार आहे. तळगाव औद्योगिक क्षेत्रात चाकण-तळेगाव- शिक्रापूर हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन सध्या वाहतूक होत आहे. मात्र, रस्ते लहान असल्याने वाहतूक कोंडीची समस्या होते. दरम्यान, आता यालाच पर्यायी रस्ता काढला जाणार आहे.












