घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

100 टक्के निकालासाठी विद्यार्थ्यांना पुरवल्या कॉपी

दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. पण पुण्यातील धायरीत शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून शिक्षण व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेत. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा म्हणून धायरीत ‘कॉपी बहाद्दर’ शिक्षकांनी नेमके काय कारनामे केले जाणून घ्या.

आठवड्याभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्येही शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क़ॉपी पुरवल्याचा प्रकार घडला होता. मात्र यावेळी परिक्षा केंद्रावरील पर्यावेक्षकांलाच चिरीमिरी देत चहापानाला पाठवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी क़ॉपीचं पान मांडून ठेवलंय. त्यामुळे याप्रकरणात शिक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी दिलेत.

गेल्या काही वर्षांपासून परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विभागीय आणि राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. कॉपी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावलेले असले तरीही परीक्षार्थी, शाळेच्या केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनाच धाक उरलेला नसल्याचं दिसतयं.आता तर विदयार्थी नव्हे तर शिक्षकचं कॉपी बहाद्दर बनत चालले आहेत.

क़ॉपीच्या प्रकरणामुळे दरवर्षी विद्यार्थी आणि शिक्षकांवर कारवाई होत असली, कारवाईचे निर्देश दिले जात असले तरी कॉपीची प्रकरण थांबवण्याचं नाव नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकांना थेट बडतर्फ करायला हवं. तरच शिक्षण व्यवस्थेला लागलेली कॉपीची वाळवी दूर होईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें