घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दुचाकीला पिकअपची धडक अन् कोयत्याने सपासप वार

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. २०) रात्री तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात आला.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्या उर्फ महेश संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) हा शुक्रवारी रात्री महेश मारूती टुले, युवराज शिंदे व राज होले यांच्यासमवेत दुचाकीवरून पाटसकडे जात होता.

मुकादमवाडी पुलावर आल्यानंतर आनंद माकर, विकी शितकल व संतोष शितकल यांनी पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघेही महामार्गावर कोसळले.यानंतर संशयित आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

गंभीर जखमी झालेल्या भागवत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याबाबत महेश मारूती टुले (रा. पाटस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड) तसेच त्यांच्या अन्य दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक गोपाळ पवार तपास करीत आहेत.दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथे शिवम संतोष शितकल व गणेश रमेश माकर या दोन युवकांचा तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

त्या दुहेरी खून प्रकरणात मृत महेश संजय भागवत याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सुमारे साडेचार वर्षांनंतर सूडभावनेतून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें