हडपसरमधील एका अल्पवयीन बड्डे बॉयला तलवारीने केक कापणे चांगलेच अंगलट आले असून, त्याच्यासह इतर मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार हडपसर येथील शेवकर वस्ती भागात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोलिस अमंलदार अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.ही घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
पुणे पोलिसांनी हत्यारांचा वापर करून रस्त्यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्हेगारी कृत्य करू नये, अशा वारंवार सुचाना दिल्या आहेत. दरम्यान, एका इन्स्ट्राग्राम अकाउंटवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत धारदार तलवारीनी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान हा वाढदिवस हडपसर येथील शेवकर वस्ती, लक्ष्मीनगर येथील यल्लाम्मा मंदिराजवळ रस्त्यावर साजरा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार, तेथील नागरिकांकडे विचारपूस केली असता दिनांक १७ फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवस साजरा केला. धारदार तलवारीने केक कापून नंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी दहशत पसरविल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बड्डे बॉय आणि त्याच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












