घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २०) किमान तापमानात एक अंश सेल्सिअसने घट नोंदविण्यात आली. तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

शहर आणि परिसरात गुरुवारी १८.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते. यात एक अंश सेल्सिअसची घट होऊन ते शुक्रवारी (ता. २०) १७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर कमाल तापमानात मात्र एक अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते ३३ अंश सेल्सिअस इतके राहिले. तापमानात चढ-उतार होत असले तरी शहरातील उकाडा मात्र कायम आहे.

शुक्रवारी पहाटे हवेत गारवा होता. मात्र, दुपारी कडक उन्हाचा चटका जाणवला. त्यानंतर सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पुणेकरांनी एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला. पुढील दोन ते तीन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर मात्र त्यामध्ये पुन्हा हळूहळू वाढ होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. २१) कमाल तापमान स्थिर राहून किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर १७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. २२) कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें