घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

MP ला निघाली अन् प्लॅटफॉर्मवरच चिमुरडीवर अत्याचार,काळजाचा थरकाप उडवणारी घटना

पुणे रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या गावी परतण्यासाठी आई-वडिलांसोबत स्थानकावर थांबलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर मध्यरात्रीच्या सुमारास लैंगिक अत्याचार करण्यात आला.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका नराधमाला अटक केली असून, या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील आहे. तिचे आई-वडील महाराष्ट्रात ऊसतोडणी मजूर म्हणून आले होते. ऊसतोडणीचा हंगाम संपल्यानंतर हे कुटुंब चार लहान मुलांसह पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. मध्य प्रदेशला जाणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी असल्याने हे कुटुंब प्लॅटफॉर्मवरच मुक्कामाला थांबले होते.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

आरोपी देखील याच कुटुंबाच्या शेजारी प्लॅटफॉर्मवर ट्रेनसाठी थांबला होता, त्यामुळे त्यांची प्राथमिक ओळख झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आई-वडील आणि इतर मुले गाढ झोपेत असताना चार वर्षांची ही बालिका जागी असल्याचे पाहून आरोपीची तिच्यावर नजर टाकली. त्याने या चिमुरडीला चॉकलेट आणि बिस्किटे देण्याचे आमिष दाखवले. खाऊच्या बहाण्याने त्याने या बालिकेला आई-वडिलांच्या जवळून उचलून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्य शेवटी जिथे अंधार आणि निर्जनता होती, तिथे नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

आरोपी आणि पीडिता दोघेही परप्रांतीय

काही वेळाने मुलगी दिसून न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मुलीच्या ओरडण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पुणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी देखील परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

लोहमार्ग पोलिसांनी पीडित बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानकावर हजारो प्रवाशांचा वावर असताना भरवस्तीत अशा प्रकारचे कृत्य घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें