शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन रंगांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे – ४११००२ येथे पार पडणार आहे.या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारच्या मोफत तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
साधारण आरोग्य तपासणी व उपचारांसोबतच रक्त तपासणी (BSL-R, ब्लड ग्रुप, बीपी, कोलेस्टेरॉल, HB, RBC, WBC, PLT) केली जाणार आहे. तसेच दंत तपासणी अंतर्गत किड काढणे, फिलिंग, स्केलिंग व पॉलिशिंग या सेवा दिल्या जाणार आहेत.
महिलांसाठी वयोगट ४० ते ६० दरम्यान स्तन कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध असून, ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू यांसह डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. जवळच्या नंबरच्या त्रासासाठी महिला व पुरुषांना मोफत चष्मा वाटपही करण्यात येणार आहे.सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सामाजिक उपक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी सुमीत कुंभार (९५२९२३९६२८) व ओमकार नवले (८३०८७६०९८५) यांच्याशी संपर्क साधावा.












