घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना निरीक्षणाखाली ठेवून सलाईन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक येथे दाखल करण्यात येत आहे.

मागील आठवड्यातही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही दिवस शरद पवार यांना विश्रांती मिळू शकते. पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.शरद पवार यांना अशक्तपणा जाणवत आहे.

पुढच्या काही मिनीटात त्यांना सलाईन लावण्यात येणार आहे त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून राहणार आहे. त्यांच्या डीहायड्रेशन जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी पुन्हा एकदा रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें