घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मुठा नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेचा ‘ट्रॅश बॅरिअर’ निर्णय

शहराची जीवनरेखा असलेल्या मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ठोस आणि तांत्रिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नदीत तरंगणारा प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि अन्य प्लास्टिक साहित्य अडविण्यासाठी नदीपात्रात ‌’ट्रॅश बॅरिअर‌’ बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बाबा भिडे पुलाजवळ एका खाजगी संस्थेने राबविलेल्या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर शहरातून वाहणाऱ्या सुमारे 44 किलोमीटरच्या मुठा नदीपात्रात विविध ठिकाणी असे बॅरिअर उभारण्याची योजना आखली जात आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली. मुठा नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, चप्पल, शालेय पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच विविध घरगुती टाकाऊ वस्तू फेकल्या जात आहेत. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली पूजासाहित्य, देवतांच्या मूर्ती आणि नारळ थेट नदीत विसर्जित केले जातात. हा सर्व कचरा पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकत संपूर्ण नदी प्रदूषित करीत आहे. परिणामी नदीचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पर्यावरणाबाबतच्या सकारात्मक भूमिकेमुळे या उपक्रमासाठी आवश्यक निधीची तरतूद होईल, अशी पर्यावरणप्रेमींना अपेक्षा आहे.

वर्शिप अर्थ फाउंडेशनचा प्रयोग यशस्वी

नदीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‌’वर्शिप अर्थ फाउंडेशन‌’ने बाबा भिडे पुलाजवळ ‌’ट्रॅश बॅरिअर‌’ बसविले. या उपक्रमामुळे चार महिन्यांत जमा होणारा कचरा आता अवघ्या एका आठवड्यात गोळा होत असल्याचे समोर आले आहे. दर आठवड्याला तीन ते चार मोठे डंपर ट्रक कचरा नदीतून बाहेर काढला जात असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक पराग मते यांनी दिली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नदी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ट्रॅश बॅरिअरच्या यशस्वी प्रयोगानंतर आता संपूर्ण नदीपात्रात 10 ते 12 ठिकाणी असे बॅरिअर उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

काय आहे ‌’ट्रॅश बॅरिअर‌’?

ट्रॅश बॅरिअर म्हणजे नदीच्या पृष्ठभागावर बसविलेले तरंगते कुंपण. हे कुंपण नदीच्या प्रवाहात अशा प्रकारे बसविले जाते की पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहतो. मात्र, पृष्ठभागावर तरंगणारा प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि इतर कचरा त्यात अडकतो. या बॅरिअरमध्ये साठलेला कचरा मशिन किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने सहज गोळा करता येतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावता येते. विशेष म्हणजे, पाण्यात सुमारे सहा फूट खोलीपर्यंत वाहणारा कचराही या प्रणालीद्वारे अडवता येतो.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें