घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

येरवडा परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात सोमवारी (ता. २३) दुपारी लागलेल्या भीषण आगीत १५ मोटारींसह ५० हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

येरवडा परिसरात भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात जुनी शासकीय वाहने आणि जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. या कार्यालयालगत वाहतूक शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. मात्र, ही जप्त केलेली वाहने या विभागाची नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहनांना अचानक आग लागली. दुचाकींना आग लागल्याने काही क्षणांत धुराचे लोट उसळले. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या धानोरी केंद्राचे अधिकारी सोपान पवार यांच्यासह तांडेल विठ्ठल सावंत, सचिन जमदाडे, जितेंद्र सपाटे, भीमसेन दाभाडे, चालक सचिन वाघमारे यांच्यासह इतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

दरम्यान, मोकळ्या जागेत वाहने ठेवलेल्या ठिकाणी कचरा साठलेला होता. तसेच, वाहनांमध्ये पेट्रोल असल्यामुळे स्फोटाचे आवाज येत होते, असे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. या घटनेत १५ मोटारी आणि ५० हून अधिक दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

ही वाहने कारवाईत जप्त करून आणून ठेवल्याची शक्यता आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें