पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे
गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक साईनाथ जोशी यांना काव्यमित्र संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दि.२२/२/२०२६रोजी काव्यमित्र संस्थेच्या वतीने २६ व्या वर्षी आयोजित श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती , जागतिक महिला दिन, समाजसेवक अष्टपैलू विचारवंत मा.सजय जंगवई जयंती , आदर्श माता ललीता विश्वनाथ जंगम यांच्या द्वितीय स्फूर्ती दिन यांचे अवचित साधून कवी सतोष मोकाशी यांच्या “आयुष्याच्या वळणावरती”काव्य संग्रहाच्या रुबाबदार प्रकाश सोळाव्या निमित्तानं हा कार्यक्रम ओडीटोरियम सायन्स पार्क पिंपरी -चिंचवड पुणेआयोजित केला होता.गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था इतिहास जोपासणे,अभ्यास संशोधन, गड किल्ले संवर्धन, जोपासणे, साफसफाई स्वच्छता मोहीम, समाज कार्य शिव कार्यास नेहमी तटस्थ कार्य करत असते, त्याचप्रमाणे समाजीक बांधिलकी, आपुलकी जपण्याचे कार्य करते.श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी निष्ठा,शिव कार्यास पाईक असे उल्लेखनीय कामगिरीमुळे साईनाथ जोशी संस्थापक -गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार काव्यमित्र संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला.











