घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील प्रसिद्ध ‘कॅम्प बर्गर’मध्ये सापडलं झुरळ

पुण्यातील तरुणाई आणि खवय्यांचे आवडते ठिकाण असलेल्या ‘कॅम्प बर्गर’चा अत्यंत बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास एका ग्राहकाने घेतलेल्या बर्गरमध्ये चक्क मोठे झुरळ सापडल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

पैशांपेक्षा ग्राहकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, हॉटेल प्रशासनाने केवळ ‘रिफंड’ची ऑफर देऊन उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पुणेकरांमधून संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका तरुणीने पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘कॅम्प बर्गर’मधून बर्गर खरेदी केला होता. मोठ्या आवडीने बर्गरचे दोन-तीन घास खाल्ल्यानंतर ग्राहकाला त्यात काहीतरी संशयास्पद आणि किळसवाणे वाटले. त्यांनी बर्गर उघडून पाहिला असता, आतमध्ये चक्क एक झुरळ आढळून आले. आपण नकळत विषारी कीटक खाल्ला असता तर काय झाले असते? या विचाराने ग्राहकाला मोठा मानसिक धक्का बसला. हा निव्वळ निष्काळजीपणा नसून ग्राहकांच्या जीवाशी खेळलेला जीवघेणा प्रकार आहे.

पैसे परत केले म्हणजे जबाबदारी संपली का?

या संतापजनक प्रकाराबद्दल तरुणीने जेव्हा कॅम्प बर्गरच्या स्टाफला जाब विचारला, तेव्हा त्यांनी कोणतीही खंत न बाळगता “आम्ही तुमचे पैसे परत (Refund) देतो,” असे उत्तर दिले. हा प्रश्न केवळ पैशांचा नाही, तर हजारो ग्राहकांच्या स्वच्छतेचा (Hygiene) आणि सुरक्षेचा आहे. जर ग्राहकाच्या लक्षात आले नसते आणि संपूर्ण बर्गर खाण्यात आला असता, तर गंभीर विषबाधा होऊन जीवितास धोका निर्माण झाला असता. त्यावेळी हेच कर्मचारी जबाबदारी घेणार होते का? असा संतप्त सवाल ग्राहकाने उपस्थित केला आहे.

FDA चे ऑडिट कुठे आहे?

पुण्यात एवढ्या नामवंत फूड जॉईंट्सच्या किचनमध्ये झुरळे कशी पोहोचतात? अन्नाच्या दर्जाची आणि स्वच्छतेची तपासणी करणारे अन्न व औषध प्रशासन (FDA) फक्त वसुलीसाठी आहे का? पुणेकरांनी आजार विकत घ्यायचे का? रस्त्यावरच्या गाड्यांवर कारवाईचा फार्स करणारे प्रशासन अशा मोठ्या आणि प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई करताना का कचरते? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

“बर्गरमध्ये झुरळ सापडल्याचा जाब विचारल्यावर कर्मचाऱ्यांनी चूक सुधारण्याऐवजी केवळ ‘पैसे परत देतो’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले. हा पैशांचा नाही, तर आमच्या जीवाचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. चुकून तो बर्गर मी पूर्ण खाल्ला असता आणि विषबाधा झाली असती, तर त्याला जबाबदार कोण? केवळ पैसे परत करून जबाबदारी झटकणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या हॉटेलवर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें