पुणे-नगर रस्त्यावर किरकोळ कारणावरून कारचालक आणि रिक्षाचालकामध्ये भररस्त्यात ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ओव्हरटेकिंग किंवा कट मारल्याच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले असल्याची शक्यता आहे.
या वादामुळे वर्दळीच्या पुणे-नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, तो आता समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.












