चोरीचा आरोप केल्याने तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटन हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अहिरे याच्या भावाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा्ंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे खासगी ठिकाणी कामाला होता. आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. आरोपींनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली होती. मारहाण, तसेच चोरीचा आरोप केल्यानंतर अतुल नैराश्यात होता.
मानसिक तणावाखाली त्याने २३ फेब्रुवारी राोजी मध्यरात्री पुणे ते काेल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींची धमकी, तसेच मारहाणीमुळे भावाने आत्महत्या केल्याची फिर्याद नुकतीच देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.












