घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ४२ लाखांची फसवणूक

चिंचवडमध्ये एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडली. या प्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले आणि जास्तीचा नफा मिळवण्यासाठी एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले.

या ॲपद्वारे फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. ॲपवर त्यांना खोटा नफा दाखवण्यात आला, परंतु तो नफा काढण्यासाठी पुन्हा टॅक्सच्या नावाखाली पैसे भरण्यास सांगण्यात आले.

अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण ४२ लाख ४८ हजार ९०० रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें