घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कारवाईची भीती दाखवून एकाची ३१ लाखांची फसवणूक

काळ्या पैसे व्यवहारात बेकायदा बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एकाची ३१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली.

याबाबत एका ५१ वषीय तक्रारदाराने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर भागात राहायला आहेत.

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली. ‘काळ्या पैसे व्यवहारात (मनी लाँड्रिग) बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार आहे.

अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्याने त्यांना दाखविली. चौकशीची भीती दाखवून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ४५ हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार तपास करत आहेत.सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी आतापर्यंत सायबर चोरट्यांनी नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें