सध्या पुणेकरांमध्ये ग्लोबल ड्रायव्हिंगची क्रेझ वाढली आहे. कारण आता पुणे आरटीओ कार्यलयामार्फत गेल्या वर्षभारात तब्बल 5 हजार 623 पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय परवाना घेतल्याची नोंद झाली आहे.यामुळे परदेशात गाडी चालवण्याची पुणेकरांची वाढी क्रेझ दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात म्हणजे 1 जानेवारी ते 21 डिसेंबर या काळात पुणे आरटीओमध्ये आंतरराष्ट्रीय परवान्यासाठी पुणेकरांची संख्या वाढली आहे. या काळात पुणे आकटीओतून 5 हजार 623 मागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे. तर पुणे आरटीओमध्ये या सर्व गोष्टींची नोंद करण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय परवान्यामुळे पुणेकरांना याचा फार फायदा झासा आहे. ज्या नागरिकांना हा आंतरराष्ट्रीय परवाना मिळाला त्यांना जगातील 105 देशांमध्ये वाहन चालवण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परवाना मिळवण्यासाठी महत्त्वाचे कागजपत्र अनिवार्य आहेत आणि आतरराष्ट्रीय परवाना मिळवायचा तरी कसा ते ही आपण जाणीन घेऊया.
आंतरराष्ट्रीय परवाना कसा मिळवायचा ?
परिवहन संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा
पासपोर्ट, व्हिसा, वैध भारतीय वाहन परवाना आणि दोन पास्पोर्ट साईज फोटो
40 वर्षावरील व्यक्तिंसाठी मेडिकल सर्टिफिकेट आणि फॉर्म 1 ए अनिवार्य
1,000 रूपय फी भरून कागदपत्रे अपलोड करावीहे झाल्यानंतर आरटीओ कार्यालयातील परवाना विभागात कागदपत्रे जमा करावी
त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यावर परवाना सुपूर्द












