घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शिक्षणाधिकाऱ्यांकडून भोरच्या शाळांची पाहणी

भोर तालुक्यातील पश्चिम भागातील निगुडघर, अंगसुळे व सांगवी भिडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी बुधवारी (ता. २५) भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या वेळी भोरचे गट शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे उपस्थित होते.या भेटींदरम्यान शाळेची इमारत, वीज, संगणक, शौचालय, पाण्याची टाकी, किचन शेड, वॉल कंपाऊंड, मैदान इत्यादींची पाहणी करण्यात आली. शालेय पोषण आहारामधील विविध बाबींची चौकशी केली. अग्निशमन यंत्र रिफिलिंग केल्याबाबत पाहणी केली.

विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व गणिती क्रिया, शैक्षणिक गुणवत्ता यांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटींवेळी विद्यार्थ्यांना लाडू व केळीचा खाऊवाटप करण्यात आला. या वेळी सोमनाथ कुंभार, माया बुदगुडे, तेजस्विनी गांगुर्डे आदी शिक्षक उपस्थित होते.

शाळा भेटीनंतर साडेपाच वाजता भोर पंचायत समिती सभागृहामध्ये गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व गट साधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

आधार, अपार, यु-डायस प्लस, मॉडेल स्कूल, निपुण, सेवानिवृत्ती कर्मचारी, समग्र अनुदान, आरटीई, पाठ्यपुस्तक, शिष्यवृत्ती, नवभारत साक्षरता कार्यक्रम, एनजीओ तसेच विद्यार्थी गुणवत्ता यांबाबत मार्गदर्शन व चर्चा झाली. मनोजकुमार पुरंदरे आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें