घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कल्याण गाव कुस्ती आखाडा-२०२६

पैलवान नरहरी अण्णा चोरगे यांना सिंहगड कुस्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि.२५/२/२०२६ रोजी करंजाईमाता उत्सवानिमित्त कल्याण (सिंहगड) कुस्ती आखाड्यात जुन्या काळातील महाराष्ट्रातील नामवंत मल्ल *मा.नरहरी अण्णा चोरगे* यांचा कल्याण गावात *नरवीर तरूण मंडळ कल्याण* तर्फे वै. हभप रामचंद्र विठोबा डिंबळे यांचे स्मरणार्थ *”सिंहगड कुस्ती गौरव पुरस्कार”* प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी कल्याण गावचे ग्रामस्थ व शिवगंगा खो-यातील अनेक मान्यवर, कुस्ती शौकीन उपस्थित होते. यावेळी नरहरी चोरगे यांच्या पै. विश्वनाथ चौधरी, मंगल सिंग परदेशी डाळवाले, हिरामण बनकर, सुदाम वाघूले आग्नेल निग्रो यांच्या बरोबर झालेल्या रोमहर्षक लढतींची आठवण करून दिली गेली.

नरहरी अण्णा हे पुण्यातील आगरवाल तालीम चे मल्ल असून हिंदकेसरी मारूती माने यांचे आवडते शिष्य होते, ते कमी वजन असूनही महाराष्ट्र केसरी खेळले होते .तसेच ते पुण्यातील फार मोठे पैलवान होते. त्यांचे महाराष्ट्रासह देशात नावलौकिक आहे.

त्यांच्या या सन्मानाबद्दल उपस्थित कुस्ती शौकीनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. कल्याण गाव दरवर्षी कुस्ती आखाडा भरवून नवीन पिढीला, कुस्ती शौकीनला प्रोस्तानप्रेरणा देण्याचे काम करत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें