पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
दशरथ शंकर धोत्रे (मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत मजुराचे नाव आहे.दशरथ धोत्रे हे चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते.
किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते. बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते.












